रसायनी : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या संकल्पनेनुसार शेती आणि शेतकर्यांच्या विकासासाठी 25 मे ते 8 जून हा उन्नत शेती पंधरवडा म्हणून खालापूर तालुक्याच्या गावोगावी जाऊन कृषी अधिकारी शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करीत आहे. ठाणे आणि रायगड हे जिल्हे शेतीप्रधान जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी या योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन रसायनीत कांबे आणि पानशिल येथे आयोजित करण्यात आले.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी या संकल्पतेने शेती आणि शेतकर्यांचा विकास व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. पाऊस सुरू होण्याचा काळ असल्यामुळे, तसेच शेतीची भाजणी, नांगरणी, खते, बियाणे याची तयारी शेतकरी करत असतात. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शेती बीज रोपण प्रक्रिया, कीटकनाशक फवारणी यासंबंधी माहिती देण्यात आली. तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर (सुळ) यांनी शासनामार्फत पुरविल्या जाणार्या सोयी, आर्थिक अनुदान याबाबतची माहिती देण्याचे काम कृषी खात्याच्या माध्यमातून होत आहे. कीटकनाशक फवारणी कशी करावी, फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे कृषी अधिकारी मनीषा खाडे यांनी पीक बियाणे पेरणी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती करून जास्त प्रमाणात नफा कसा मिळविता येईल याचे त्यांना मार्गदर्शनही केले.