Breaking News

खासदार सुनील तटकरेंच्या सत्कार समारंभातच शेकापच्या महादेव दिवेकरांना अटक

पेण : अनिस मनियार

पेण तालुक्यातील ज्येष्ठ शेकाप नेते आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य महादेव दिवेकर यांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. 4) अटक केली. एका जागेच्या अपहार व्यवहाराबाबत सुरू असलेल्या खटल्याबाबत न्यायालयाने महादेव दिवेकर यांना हजर करण्याबाबत अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने ही कारवाई केली. नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार समारंभ सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी दिवेकर यांना पेण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना जमीन मंजूर केला.

 पेण तालुक्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते महादेव दिवेकर यांच्या विरोधात एका जागेबाबत अपहारप्रकरणी पेण न्यायालयात खटला सुरू आहे. त्या खटल्याच्या अनुषंगाने न्यायालयाने महादेव दिवेकर यांना हजर करण्याबाबत अटक वॉरंट काढले होते. 3 जून रोजी खासदार सुनील तटकरे यांचा आगरी समाज मंदिर पेण येथे जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता. या वेळी महादेव दिवेकरही या सत्कार समारंभाला उपस्थित होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे पथकाने येऊन दिवेकर यांना अटक केली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply