Breaking News

खोपोलीत टोईंग गाडी बंद

खोपोली : प्रतिनिधी

 शहरातील वाहतूककोंडीवर व रस्त्यालगत बेशिस्त वाहने उभे करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या संवादातून बाजारपेठेत नो पार्किंग झोन निर्माण करून समविषम पार्किंग अंमलात आली. याकरिता टोईंग गाडीच्या माध्यमातून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली परंतु टोईंग गाडी महिन्यापासून बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होत चालल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खोपोली शहर झपाट्याने वाढत असून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाजारपेठ व कामानिमित्त वाहने घेऊन येणारे वाहनचालक बाजारपेठेतील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा उभी करीत असून त्यातच बेकायदेशीर हातगाडी फळविक्रेते रस्त्यावर गाडी उभी करीत असल्याने वाहतूककोंडी होऊन बाजारहाट करण्यासाठी आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असून दिवसेंदिवस ही समस्या अधिक जटील बनत चालली आहे.

पालिका प्रशासन व पोलिस यंत्रणा वाहतूककोंडीवर थातुरमातूर उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप सर्वत्र केला जात आहे. शहरात टोईंग गाडी सुरू होती तेव्हा नागरिकांना रस्त्यावरून चालणे सुखद होत होते परंतु पोलिस यंत्रणा व पालिका प्रशासनाने सुरू केलेली टोईंग गाडी बंद झाल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply