नागोठणे : प्रतिनिधी
स्थानकाचे आवारात शिरत असताना समोरून आलेल्या मोटरसायकलच्या चालकाला गाडी बाजूला घेण्यात सांगितल्याने राग अनावर होऊन मोटरसायकलस्वारासह इतर दोघांनी एसटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नागोठणे एसटी बसस्थानकात घडली होती. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बसचालक दीपक उमाजी खंडागळे (51) रा. चिंचपाडा, पेण) यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुरुवारी सायंकाळी नागोठण्यातील अकिब इलामी (27), आदिल पानसरे (19) आणि अरमान मन्सुरी (26) या तीन तरुणांना ताब्यात घेतले.