मुंबई ः मुंबईत रविवारी (दि. 9) मरीन ड्राइव्ह व जुहू अशा दोन्ही ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात 11 वर्षीय मुलाचा बुडून, तर जुहू बीचजवळ समुद्रात बुडून एका 40 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास घडल्या. भैरव बरिया व महेश शिंदे अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. जुहू बीचजवळ इस्कॉन मंदिरालगतच्या समुद्राच्या भागात बुडून महेश शिंदे मृत्युमुखी पडले. शिंदे मुलांसोबत पाण्यात खेळताना लाटांचा जोर वाढल्याने ते खोल पाण्यात बुडाले. सायं. 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. दुसर्या घटनेत मरीन ड्राइव्ह येथे भैरव बरिया हा मुलगा पाण्यात बुडाला. त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …