Breaking News

उमंग संस्थेला सोलर सिस्टीम भेट

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथे वर्ल्ड चिल्ड्रेन वेल्फेअर ट्रस्टची उमंग ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून गेल्या 10 वर्षांपासून मूकबधिर व अनाथांचा सांभाळ करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिकवण दिली जाते.

संस्थेचे विश्वस्त कृष्णन रामानुजम यांच्या प्रयत्नाने व एल्कॅम साऊथ आशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने उमंग या  संस्थेला सोलर सिस्टीम पॅनेल व 10 केव्ही क्षमतेचे इनव्हर्टर भेट देण्यात आले. या वेळी संस्थेच्या संस्थापक सुलोचना कार्लो, कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, कंपनीचे एमडी श्रीनिवास अय्यर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply