Breaking News

हायवेवरून टँकर 20 फूट खाली कोसळला; चालकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर

पुण्याहून मुंबईला निघालेल्या केमिकल भरलेला टँकर एक्सप्रेस हायवेवरील पनवेलजवळील नेवाळी ब्रिजजवळ आला असता रस्तासोडून 20 फूट खाली कोसळल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अरविंद यादव याला आपला जीव गमवावा लागला आहे.

या अपघातात टँकरची पुढील चाके निखळली असून बाजूला फेकली गेली आहेत. यावरून या अपघाताची भीषणता दिसून येते. चालक अरविंद यादव वय 42 हा हाजीमलंग रोड कल्याण येथील रहिवासी आहे. अपघाताबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे पनवेल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply