पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुर्बी गावात विविध समस्या आहेत. या समस्यांची पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी रस्ते गटारे, सिव्हरेज लाईन यासारख्या समस्यांचा आढावा घेतला. या वेळी प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, भाजप युवा नेता नितेश पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता जगताप यांच्यासह महापालिका व सिडको व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.