Breaking News

तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव ; सह्याद्री प्रतिष्ठानच्या सोहळ्याला सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांची उपस्थिती

कर्जत : बातमीदार

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात विशेष महत्व असलेल्या कर्जत तालुक्यातील कोथळीगडावर सापडलेल्या तोफांचे पुनरुज्जीवन करून त्या रविवारी (दि. 9) लाकडी गाड्यावर बसविण्यात आल्या. सह्याद्री प्रतिष्ठानने राबविलेला हा उपक्रम येणार्‍या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार असून तोफगाडा दुर्गार्पणामुळे कोथळीगडाला पुनर्वैभव प्राप्त झाले, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल जाधव यांनी केले. 

सह्याद्री प्रतिष्ठान -कर्जतच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले कोथळीगड (पेठ) येथील तोफगाडा दुर्गार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अमोल जाधव मार्गदर्शन करीत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती येसाजी कंक यांचे 14 वे वंशज सिद्धार्थ कंक यांची विशेष उपस्थिती होती.

सह्याद्री प्रतिष्ठानने ऐतिहासिक वैभवाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमांमुळे  गड किल्ल्याच्या वैभवात निश्चितपणे भर पडून, भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे सिद्धार्थ कंक यांनी सांगितले.

सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. गणेश रघुवीर यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. यावेळी श्रीमंत साबुसिंग पवार यांचे वंशज दिग्विजयसिंह पवार वाघळकर, सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज राजकुमार पायगुडे, पेठचे सरपंच मंगेश दळवी, भाजप युवामोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर, कैलास निलधे यांच्यासह पेठ व आंबिवली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. या सोहळ्यात शिवशाहीर वैभव घरत पोवाडे सादर केले.

– लोकवर्गणीतून बसविला तोफगाडा कर्जतपासून अवघ्या 40 किमी अंतरावर कोथळीगड उर्फ पेठ किल्ला आहे. इतिहास अभ्यासक, संशोधकांनी केलेल्या लिखानामध्ये या गडावर केवळ दोन तोफा असल्याची नोंद होती. त्यातील एक उखळी तोफ ही गडाच्या माचीवरील पेठ या गावात तर गडाच्या दुसर्‍या प्रवेशद्वाराजवळ दुसरी तोफ आहे. गडावर तिसरी तोफ नाही, असे बर्‍याच इतिहास अभ्यासकांनी सांगितले होते. मात्र गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार तिसरी तोफ गडाच्या परिसरात आहे. गडावर असलेल्या 6.5 लांबीच्या तोफेला सह्याद्री प्रतिष्ठानने  लोकवर्गणीतून तोफगाडा बसविला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply