Breaking News

‘रायगडसह महाराष्ट्रातील डोंगरी विकास कार्यक्रमासाठी 31 कोटीचा निधी’

मुंबई : प्रतिनिधी

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांतील खर्च भागविण्यासाठी 31 कोटी 35 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, डोंगरी भागाच्या विकासासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 95 कोटी  रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यातून चार महिन्यांच्या खर्चासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या विकासाला यातून चालना मिळणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. हा निधी घालून दिलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून खर्च करता येणार आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply