Breaking News

आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यांतून इंग्लिश खेळाडू ‘आऊट’

लंडन ः वृत्तसंस्था

कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 14वा हंगाम पुढे ढकलला. बीसीसीआय या लीगच्या उर्वरित सामन्यांबाबत आशादायी आहे, मात्र उर्वरित सामन्यांत इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाहीत, असे इंग्लंड क्रिकेटचे संचालक एश्ले जाइल्स यांनी म्हटले आहे. जाइल्स म्हणाले, आम्ही इंग्लंडच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना सहभागी करण्याचा विचार करीत आहोत. आम्हाला पूर्ण एफटीपी वेळापत्रक प्राप्त झाले आहे. जर पाकिस्तान आणि बांगलादेशचा दौरा (सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये) वेळापत्रकानुसार पुढे गेला तर मला आशा आहे की, आमचे सर्व खेळाडू तिथे असतील. बीसीसीआय सप्टेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक संपल्यानंतर आयपीएलसाठी विंडो शोधत आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड संघ बांगलादेशला भेट देईल. भारताबरोबर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेतल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यात ते पाकिस्तान दौरा करतील. यानंतर इंग्लिश संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळेल आणि  डिसेंबरपासून सुरू होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाईल. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास वाव नाही, असे जाइल्स यांनी स्पष्ट केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply