Breaking News

जिल्हा नियोजन समिती सदस्यांची नियुक्ती

अलिबाग : प्रतिनिधी

शासनाने गुरुवारी रायगड जिल्हा नियोजन समितीवर 2 नामनिर्देशित सदस्य तर 11 विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. माजी आमदार देवेंद्र साटम, अ‍ॅड . महेश मोहिते, सतीश धारप, जगदीश गायकवाड यांचा या सदस्यांमध्ये समावेश आहे.रायगड जिल्हा नियोजन मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून माजी आमदार देवेंद्र साटम आणि सतिश धारप या दोन भाजप नेत्यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा नियोजनाचा ज्ञान असलेले सदस्य म्हणून ते काम पहाणार आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून 11 सदस्यांची नियुक्ती झाली आहे. त्यात विष्णू पाटील, अ‍ॅड. महेश मोहिते, महेंद्र दळवी, जयवंत दळवी, कृष्णा कोबनाक, अरुण भगत, जगदीश गायकवाड, आत्माराम पाटील, राजू साबळे, जगदीश ठाकूर आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply