Breaking News

श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह

पनवेल : रामप्रहर वृत्त

देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळा जय हनुमान मंदिर, न्हावा खाडी, उत्तरपाडा, ता. पनवेल येथे श्री. स.स. बाळासाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन शनिवारी (दि. 22) दुपारी 12 वाजता माऊलींवर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. या सप्ताहात श्री दासबोध श्री. स.स. बाळकृष्ण महाराज चरित्रामृत, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांचे पारायण होईल. दरम्यान भजन, प्रवचन, कीर्तन, ध्यान आदी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. तरी सर्व भक्त भाविकांनी, गरुबंधू-भगिनींनी भक्ती, संतसेवा करून आपले प्रापंचिक व परमार्थिक जीवन सफल करावे, असे आवाहन व्यवस्थापक अध्यक्ष कानाशेठ ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply