Breaking News

तन्वी गावंड हिचे संगणक विज्ञान अभियांत्रिकी शाखेत सुयश

उरण : प्रतिनिधी

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने  घेतलेल्या परीक्षेचे अभियांत्रिकी शाखेच्या तिसर्‍या वर्षाचे निकाल जाहीर झाले. या तिसर्‍या वर्षात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पेण महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या डिपार्टमेंटमध्ये सलग तीन वर्ष तन्वी विलास गावंड या विद्यार्थिनीने 83.50 टक्के  गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळविला आहे.  तन्वीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. भामरे, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, गोल्डन ज्युबलीचे अनिल घरत, माधव म्हात्रे, अबा पाटील, दिनेश म्हात्रे, साईनाथ पाटील, मुकेश गावंड, समीर गावंड, सत्यवान म्हात्रे, प्रगती म्हात्रे, आंतरराष्ट्रीय कराटेपटू गोपाळ म्हात्रे, सुयश क्लासेसचे अध्यक्ष निवास गावंड, निगा फाऊंडेशनचे नीलेश गावंड, आवरे गावच्या सरपंच राजश्री गावंड, प्रवीण गावंड, राकेश गावंड आणि तन्वीचे आईवडील यांनी कौतुक केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply