Breaking News

‘स्वच्छंद’तर्फे देवदिवाळी साजरी

पनवेल : रामप्रहर

स्वच्छंद सामाजिक विकास संस्थेच्या वतीने देवदिवाळीचा कार्यक्रम बुधवारी (दि. 27) साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्यक्ती आणि नातेसंबंध यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. देवदिवाळीच्या कार्यक्रमामध्ये सुनेला मुलगी मानून घराचे सुख टिकवून ठेवण्यात खरे सुख आहे, असे ठाम प्रतिपादन अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. या वेळी पनवेल महापलिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, माजी नगरसेविका वर्षा नाईक, प्रीती भुजबळ, छाया कांडपिळे, नंदिनी भुजबळ, संस्थेच्या अध्यक्षा नीता घाटुकडे, सुलभा मोरे, संध्या भुजबळ, स्वाती गरुड, माया देसाई आदी उपस्थित होते. या वेळी दीपप्रज्वलन करून हा देव दिवाळीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply