Breaking News

जलयुक्त शिवारचा मुख्य हेतू असफल

कर्जत तालुक्यात यावर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा हेतू असफल झालेला दिसून येत आहे. तालुक्यातील आठ गावात जलयुक्त शिवार अभियानचे माध्यमातून जलसंधारणाच्या नावाखाली कामे झाली आहेत. मात्र जलसंधारण म्हणजे शेत तयार करणे नाही त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश बाजूला पडला असून गतवर्षी खुद्द या तालुक्याचे आमदार सुरेश लाड यांनी जलयुक्त शिवारवर कर्जत तालुक्यात खर्च करू नये, अशी सूचना केली होती. दरम्यान, तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी जलयुक्त शिवार बिनकामाचे ठरत असून केवळ शेती दुरुस्ती, बांधबंदिस्ती आणि गाळ काढण्याची कामे करून काय सध्या होणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जाण्याचे हे चौथे वर्षे आहे. पहिल्या वर्षी मांडवणे, जामरूख आणि ओलमन प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. त्यात त्या ठिकाणी बांधलेले सिमेंट बंधारे आणि खोदलेले शेततलाव यातून शेतकर्‍यांना रोजगार देखील उपलब्ध झाले आहेत. मांडवणे येथे त्यावेळी राजनाला कालव्याचे दुरुस्तीचे काम बंद असल्याने तेथे शेतीसाठी काय पण पिण्याचे पाणी देखील गायब झाले होते, मात्र जलयुक्त शिवारमधील कामांमुळे पुढील उन्हळ्यात तेथील बोअरवेलला पाणी वाढले असल्याचे दिसून आले होते. त्या गावात जलयुक्त शिवार अभियानचे माध्यमातून शेततलाव कृषी खात्याने खोदून दिले होते. त्या तलावात कृषी विभागाने मासे सोडून दिले होते आणि त्यातून शेत जमीन मालक असलेला शेतकरी मत्स्य व्यवसाय करून कुटुंबाबाचे उदरनिर्वाह करीत होता. कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई ग्रस्त भाग म्हणून परिचित असलेल्या जामरूख भागात मोठ्या प्रमाणात गाव तलाव आणि सिमेंट बंधारे यांची कामे केली गेले होती. त्यामुळे तेथील पाणीटंचाई दूर करण्यास मदत झाली होती. ओलमन गावात बांधलेले सिमनेत बंधारे यांच्यात साठून  याचा प्रयोग यशस्वी झाल्याने ते बंधारे पाहण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्यातील कृषी अधिकारी आले होते.

 नंतरच्या वर्षी धामणी, मेचकरवाडी, आसल, कळंब,कुरुंग, पाथरज या गावात मातीचे बंधारे, तलाव, नवीन शेत निर्माण करण्याची कामे केली गेली. कळंबमध्ये जुन्या सिमेंट बंधार्‍यांना पुनर्जन्म देण्याचे काम जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झाले आहे. मेचकरवाडी आणि बेडीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन शेत निर्माण करताना त्या भागात माती तलाव खोदण्यात आले होते. आसल या महसुली गावात तीन सिमेंट बंधारे यांची निर्मिती केली गेली आहे. कुरुंग या वारे ग्रामपंचायतमधील गावामध्ये नवसूचीवाडी, गिर्‍याचीवाडी भागात मोठ्या प्रमाणात डोंगरात चर खोदण्यात आले होते, तसेच त्या ठिकाणी तीन मातीचे बांध देखील  आले होते, अशा प्रकारची जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आल्याने त्या त्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. पहिल्या दोन-तीन वर्षात कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान राबविताना पाणीटंचाई कमी होण्यासाठी काय करता येईल, हे पाहण्यात आले. त्यानुसार नवीन सिमेंट बंधारे यांची निर्मिती केली गेली. तर जुन्या सिमेंट बंधारे यांची दुरुस्ती केली गेली आहे. त्याचवेळी प्रामुख्याने डोंगरातून वाहत खाली येणारे पाणी त्याच ठिकाणी जिरविण्यासाठी समतर चर मोठ्या प्रमाणात खोदले आहेत. जेणेकरून त्या जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून पाणी जमिनीत जिरवू, बंधार्‍यात पाणी साठा निर्माण करून पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्याचे काम कृषी विभागामार्फत झाले आहे.

पण 2019 या यावर्षी कर्जत तालुक्यातील ज्या दहा गावात जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले. तेथे हे अभियान फक्त जुनी शेत दुरुस्ती, नवीन शेत तयार करणे आणि तलावातील गाळ काढणे याशिवाय कोणतेही प्रकारची कामे समाविष्ट केली गेली नाहीत. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे हा उद्देश अशी कामे करून जलसंधारण सध्या होईल का? कारण यावर्षी बळीवारे, नांदगाव, खांड सचई, चेवणे, झुगरेवाडी, जुम्मापट्टी, चाफेवाडी, माणगाव या नऊ गावात केवळ दुरुस्तीची कामे केली गेली आहेत. जुनी शेत दुरुस्ती करते देखील अभियानातून अनेकांना रोजगार मिळावा, अशी कामे करण्याचे निर्देश आहेत. परंतु, बहुतेक ठिकाणी नवीन शेत तयार करतं ट्रॅक्टर ऐवजी जेसीबी मशीन लावून त्याद्वारे शेते  तयार केली आहेत. भडवल या ठिकाणी केवळ एकमेव सिमेंट बंधारा या अभियानात समाविष्ट आहे, त्यामुळे कर्जत तालुकयातील जलयुक्त शिवार अभियानचे कामावर जो लेको रुपयांचा खर्च राज्यसरकार करीत आहे. तो केवळ शेतांची दुरुस्ती करण्यासाठीच का, असा प्रश्न उभा राहत आहे.

खांडस, चई, चेवणे, झुगरेवाडी, बळीवारे, नांदगाव अशा तालुक्याचे  टोकावर असलेल्या गावात जलयुक्त शिवार अभियान राबविताना सर्रास पणे जेसीबी मशीन लावून शेत दुरुस्ती आणि नवीन शेत पाडण्याचे काम केले गेले आहे. यांत्रिकाकरणाच्या माध्यमातून अशी कामे केल्याने ज्या कुटुंबांनी रोजगार मिळावा म्हणून रोजगार हमीमध्ये जॉब कार्ड तयार केली आहेत, त्यांना कामे मिळाली नाहीत आणि त्यांचा रोजगार देखील बुडाला आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने किमान ती कामे करण्याची परवानगी असताना तिकडे जेसीबी मशीन लावून कामे केली गेली तर लवकर पूर्ण करण्यात कृषी विभागाला यश आले आहे. पण अनेकांचा रोजगार बुडाला आहे, याचे कृषी विभागाला आणि रोजगार हमी योजना राबविणार्‍यांना सोयरसुति नाही. जुम्मापट्टी या भागात तर शेत तयार करण्यासाठी तेथे चक्क उभी असलेली झाडे तोडण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियान राबविताना जमिनीची भूजल क्षमता वाढवून जुन्या पाणवठे यांना पाण्याचे स्त्रोत निर्माण करणे आणि तेथे उभी असलेली झाडे यांना म्हणून पाणी अडविण्याचे काम करताना ज्यांच्यासाठी पाणी अडविले जाणार तीच झाडे तोडून टाकली गेली हे कृषी अधिकार्‍यांनी कसे सहन केले, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

गतवर्षी जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत अशी चुकीच्या पद्धतीने कामे केली जाणार असतील तर मग आमच्या तालुक्याला जलयुक्त शिवार अभियान नको, अशी भूमिका आमदार सुरेश लाड त्यांनी बैठकीत स्पष्ट केली होती. पाणीटंचाई कमी करण्यासाठी काम होण्याऐवजी ठेकेदार मंडळींचे खिसे भरण्यासाठी अभियान चालू असल्याचा थेट आरोप त्यावेळी केला गेला होता. मात्र असे खडेबोल मिळवूनहि कर्जत तालुक्यातील दहा गावात केली गेलेली जलयुक्त शिवार अभियानाची कामे कोणाच्या फायद्यासाठी, असा प्रश्न समोर येत आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply