Breaking News

40 हजाराच्या दुचाकीची चोरी

पनवेल : नवीन पनवेल येथील निल हॉस्पीटलच्या पाठीमागील गल्लीतील रस्त्यावर लावलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश अनिल गोवळकर (21 वर्षे) हा विचुंबे येथे राहत असून पनवेल येथील पुरी कंपनीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. टीव्हीएस अ‍ॅन्टॉक कंपनीची एमएच 01 डीडी 2299 या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने त्याने नवीन पनवेल सेक्टर 1 येथील नील हॉस्पीटलच्या पाठीमागील गल्लीत गाडी लावली होती. 40 हजार रुपये किमतीच्या या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली आहे.

– दुचाकी चोरली

पनवेल : दुकानाच्या गोडावुनमध्ये पार्क करून ठेवलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली. रजत अनिल जैन (वय 30 वर्ष) यांनी 10 हजार रुपये किमतीची होन्डा डिओ क्रं. एमएच 46 वाय 6309 ही तळोजा येथील दुकानाच्या गोडावुनमध्ये पार्क करून ठेवली होती. चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली आहे.

-कचरा नाल्यामध्ये सोडणार्‍या इसमाविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : तळोजा एमआयडीसी प्लाँट नं पी/20 जवळील अग्निशमन केद्राच्या मागील मोकळ्या जागेत दीड ते दोन टन औद्योगिक घातक घनकचरा अशास्त्रीय पद्धतीने टाकल्याचे व द्रवरूप स्वरूपाचा कचरा पावसाळी नाल्यामध्ये सोडणार्‍या इसमाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 नोव्हेंबऱ 2018 रोजी तळोजा एमआयडीसी प्लाँट नं पी/20 येथील अग्निशमन केद्राच्या मागील मोकळ्या जागेत दीड ते दोन टन औद्योगिक घातक घनकचरा अशास्त्रीय पद्धतीने टाकल्याचे व पावसाळी नाल्यामध्ये द्रवरूप स्वरूपाचा घनकचरा साचल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आले होते. या वेळी घनकचर्‍याचे नमुने विहित पद्धतीने संकलित करून परीक्षणासाठी मध्यवर्ती प्रयोगशाळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महापेकडे पाठविण्यात आले होते. सदर घनकचरा तपासणी अहवाल प्राप्त झाला व पर्यावरण संबंधित नियमांचे उल्लंघन झाले असल्याने आरोपीविरोधात 14 जून 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply