Breaking News

खारघरमध्ये कमी दाबाने पाणी

खारघर : प्रतिनिधी

सिडकोच्या मालकीच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला बिघाड झाल्याने खारघर शहरातील पाणीपुरवठा रविवारपासून खंडित झाला आहे. तीन दिवस उलटूनही पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.खारघरसह उलवे, द्रोणागिरी नोडमध्ये हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे मुलांच्या शाळा सुरू झाल्याने शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग सुरू असताना अघोषित अशी पाणीबाणी निर्माण झाली आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने प्रभाग अ चे सभापती शत्रुघ्न काकडे यांना माहिती मिळताच त्यांनी काम सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, तसेच हेटवणे धरण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राजेश हातवार हेदेखील उपस्थित होते. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घडीला जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे, मात्र पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply