Breaking News

लिव्हरपूलचा विजय; बार्सिलोनाची बरोबरी

लिव्हरपूल : वृत्तसंस्था

जॉर्गिन्होने पेनल्टीवर नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आयक्सला 4-4 अशा बरोबरीत रोखले, तर बलाढ्य बार्सिलोनाला स्लॅव्हिया प्रहाविरुद्धच्या लढतीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतविजेत्या लिव्हरपूलने गेन्क संघावर 2-1 असा विजय मिळवला.

अ‍ॅनफिल्ड स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात जिऑर्जिनो विज्नाल्डमने 14व्या मिनिटाला गोल करीत लिव्हरपूलला आघाडीवर आणले. त्यानंतर मवाना समाटा याने 40व्या मिनिटाला गेन्कला बरोबरी साधून दिली, पण दुसर्‍या सत्रात अ‍ॅलेक्स ओक्साल्डे-चेंबरलेन याने केलेला गोल लिव्हरपूलच्या विजयात निर्णायक ठरला. या आठवड्यात मँचेस्टर सिटीविरुद्ध होणार्‍या महत्त्वपूर्ण सामन्याकरिता लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी काही महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती दिली होती.

जॉर्गिन्होने दुसर्‍या आणि 71व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करीत चेल्सीला आघाडीवर आणले. त्यातच सेसार अझिलीक्यूएटा (63व्या मिनिटाला) आणि रीस जेम्स (74व्या मिनिटाला) यांनीही चेल्सीसाठी गोल नोंदवले. आयएक्सला टॅमी अब्राहम (दुसर्‍या मिनिटाला) आणि केपी अरीझाबालागा (35व्या मिनिटाला) यांच्या स्वयंगोलमुळे दोन गोलचा बोनस मिळाला. त्यानंतर क्विनी प्रोम्स (20व्या मिनिटाला) आणि डॉनी व्हॅन डे बीक (55व्या मिनिटाला) यांनी गोल करीत चेल्सीविरुद्धचा सामना 4-4 असा बरोबरीत सोडवला.

बोरुसियाचा मिलानवर विजय

अन्य सामन्यांत अच्राफ हाकिमीने 51व्या आणि 77व्या मिनिटाला अनुक्रमे दोन गोल करून बोरुसिया डॉर्टमंडला इंटर मिलानविरुद्ध 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ज्यूलियन ब्रँडट्ने 64व्या मिनिटाला केलेला गोल डॉर्टमंडच्या विजयात मोलाचा ठरला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply