Breaking News

केरळमध्ये 21 जणांचा मृत्यू; डझनभर बेपत्ता

तिरूअनंतपूरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 21वर पोहचली आहे. शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसासह भूस्खलनामुळे 12पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पोलीस आणि अग्निशमन दल तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पर्वतीय भागात पूर आला असून नद्या ओसंडून वाहत आहेत. समोर आलेली परिस्थिती भीषण असल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे. नागरिकांनी आपल्या घरातच किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ते केरळमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार केरळ सरकारला मदत करेल, असे सांगितले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply