Breaking News

टीआयपीएलतर्फे ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ अभियान

पनवेल : रामप्रहर वृत्त : महाराष्ट्र राज्य वाहतूक शाखेकडून सुरक्षित प्रवासासाठी ‘कॅम्पस विथ हेल्मेट’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंंतर्गत टीआयपीएल कंपनीतर्फे पाडेघर येथील प्रवेशद्वारापाशी गुरुवारी (दि 20) दुपारी अभियानाला सुरुवात झाली.

या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक विभागाचे सहा. आयुक्त राजेंद्र चव्हाण, इन्स्पेक्टर पराग सोनावणे यांच्या हस्ते झाले. यावेळी टीआयपीएलचे अधिकारी श्री. भरणीकुमार, जगदीश घरत, अकबर सोलकर, चिंतामण घरत व अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी हेल्मेटचे महत्त्व विषद करून सांगितले व दुचाकीस्वारांनी हेल्मेटशिवाय वाहन चालवू नये असे आवाहन करण्यात आले. या अभियानाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply