नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचे म्हटले आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.
गांगुली म्हणाला, गेल्या सहा-सात महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे. संघातल्या सर्व खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेला साजेसा खेळ केला आहे.