पनवेल : तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, महिला व बालकल्याण सभापती लिना गरड, प्रल्हाद केणी आदी मान्यवर उपस्थित होते.