Breaking News

सीकेटीचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

पनवेल : रामप्रहर वृत्त

सीकेटी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची परंपरा राखत पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलीच बाजी मारली आहे. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इ. पाचवीच्या पूजा मिलिंद नामे, सृष्टी सुरेश पाटील, श्रावणी अमर थळे, जान्हवी सुनील हिरे, प्रचिती मयूर भोसले, श्रुती संजय पाटील, आर्या विलास यशवंतराव, हर्ष जगदिश भानुशाली या आठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. पूर्व माध्यमिक म्हणेजच इ. आठवीच्या प्रज्ञान प्रवीण खंडाकळे या विद्यार्थ्याने पनवेल तालुक्यात 11 वा क्रमांक संपादन केला आहे. प्रज्ञान खंडाकळे आणि चेतन किशोर चौधरी, साशा प्रसाद वायंगणकर, अर्पिता ब्रिजकिशोर सिंग या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यालयात विशेष मार्गदर्शन केले जाते. जादा तासिका घेतल्या जातात, तसेच वेळोवळी सराव परीक्षा घेतल्या जातात. तज्ज्ञ विषय शिक्षक विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. असे यावेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक़, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply