Breaking News

‘त्या’ पाटर्या कुणाच्या आशीर्वादाने?

  • भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल
  • सीबीआय चौकशी करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही सेलिब्रिटी पाटर्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाटर्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? असे सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करून सूचक टिपण्णी केली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात वारंवार सेलिब्रिटी पार्ट्यांचा उल्लेख होतोय. लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाला आईच्या अंत्यसंस्कारालाही जाण्याची मुभा नव्हती. अशा वेळी सेलिब्रिटी पाटर्या कुणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या? मंत्र्यांच्या की अधिकार्‍यांच्या? या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. शेलार यांच्या ट्विटमुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मंत्री आणि अधिकार्‍यांच्या दिशेने सूचक इशारा केला आहे, मात्र सरकारमधील मंत्र्याचे त्यांनी थेट नाव घेतलेले नाही. त्यामुळे सरकारमधील हा मंत्री कोण, असा सवाल केला जात आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply