
पनवेल : दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले भाजपचे सदस्य मनोहर मारुती पाटील, हर्षदा सुजित पाटील, अक्षता मयूर म्हात्रे व वैशाली कैलास पाटील यांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्मिता ठाकूर, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, युवा नेता राजेश ठाकूर, मयुर म्हात्रे, राजेश पाटील, कैलास पाटील, बूथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर उपस्थित होते.