Breaking News

भारताला पाठिंबा देणार की इंग्लंडला? नासीर हुसैनचा पाक क्रिकेट रसिकांना सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मजबूत दावेदार असलेला इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. या संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे रविवारी होणार्‍या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, असा सवाल इंग्लंड क्रिकेट संघांचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना केला आहे. या सामन्यात नेमक्या कोणत्या संघाला पाठिंबा द्यावा, असा सवाल पाक क्रिकेटरसिकांना पडला आहे.

पाकिस्तानने याआधीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत सेमीफायनलमध्ये पोहचण्याची शक्यता कायम ठेवली आहे, तसेच इंग्लंडसमोरही मोठे आव्हान उभे केले. इंग्लंडचा संघ सध्या चौथ्या स्थानावर असून त्यांचा न्यूझीलंड आणि भारताशी सामना होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकून इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो, मात्र त्यासाठी त्यांना हे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. अशा अटीतटीच्या परिस्थितीत इंग्लंड संघांचा माजी कर्णधार नासीर हुसैन याने पाकिस्तानी फॅनसाठी ट्विट केले आहे. ‘रविवारी इंग्लंड आणि भारताच्या सामन्यात तुम्ही कोणासोबत आहात..’ असा सवाल हुसैन याने पाक क्रिकेटप्रेमींना केला आहे.

पाकिस्तानचे अफगाणिस्तान आणि बांग्लादेशशी सामने होणार आहेत. या दोन्ही सामन्यांत विजय मिळवल्यावर त्यांचे 11 गुण होतील, तर इंग्लंडने दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे 12 गुण होणार आहेत आणि ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. तिसरीकडे श्रीलंकेनेही त्यांचे राहिलेले तीन सामने जिंकल्यास ते सेमीफायनलमध्ये पोहचणार आहेत. त्यामुळे रविवारी होणार्‍या सामन्यात कोणत्या संघाला पाठिंबा द्यायचा, असा सवाल पाकिस्तानी क्रिकेटरसिकांसमोर आहे आणि तोच प्रश्न त्यांना नासीर हुसैनने केला आहे.

– यजमानांसाठी लढत महत्त्वाची

भारत आणि इंग्लंड या प्रबळ दावेदारांमध्ये रविवारी मुकाबला होणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसर्‍या, तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे. इंग्लंडला मात्र उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे हा सामना इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत-इंग्लंड यांच्यांत आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 53, तर इंग्लंडने 41 सामने जिंकले आहेत. उभय संघात दोन सामने बरोबरीत सुटले आणि तीन अनिर्णीत राहिले. वर्ल्ड कप स्पर्धेत ते संघ सातवेळा समोरासमोर आले आणि त्यात दोघांनी प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. यापैकी इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीनपैकी दोन लढती भारताने जिंकल्या आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply