Breaking News

शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

फलटण : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पवार यांना त्याचा शुक्रवारी

(दि. 22) फलटण दौर्‍यात अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. गोंधळामुळे पवारांनी आपले भाषणही थांबवले.

माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले.

यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी ‘सर्व सांगा, खरं सांगा’ असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांनी मध्यस्थी करीत सर्वांना खाली बसण्यास विनंती केली. खुद्द शरद पवारांनाही पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने पवार हताशपणे हा वाद पाहत राहिले.

‘आमचा वाद प्रभाकर देशमुख यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीत जिल्हास्तरावर वाद आहे. ते आम्हाला शरद पवारांपर्यंत पोहोचू देत नाहीत,’ असा आरोप शेखर गोरे यांनी केला आहे. या प्रकारामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply