लखनऊ : वृत्तसंस्था
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी (दि. 24) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत.
मोदी सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात छोट्या शेतकर्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना घोषित केली. शेतकर्यांना थेट आर्थिक मदत देणारी ही योजना महत्त्वाची समजली जाते. या योजनेवर 75 हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातील. त्याचा पहिला हप्ता रविवारी देण्यात येणार आहे.