Breaking News

पोलादपूर नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद

शिवजयंतीनिमित्त काँग्रेस नगरसेवकांनी लावला दरवाजालाच पुष्पहार

पोलादपूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोलादपूर नगरपंचायत कार्यालय खुले असेल, अशी अपेक्षा करून काँग्रेसचे नगरसेवक शनिवारी (दि. 19)सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार घेऊन कार्यालयाकडे गेले. मात्र त्यांना नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे नगरसेविका आशा गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड, संतोष चव्हाण यांनी कार्यालयाच्या कुलूपबंद दरवाजालाच पुष्पहार अर्पण केला. स्वप्नील भुवड यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या वेळी अ‍ॅड. सचिन गायकवाड, काँग्रेस शहराध्यक्ष अमोल भुवड उपस्थित होते.

दरम्यान, नगरपंचायत कार्यालयात उपनगराध्यक्षांच्या हस्ते व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आटोपून सत्ताधारी नगरसेवक निघून गेल्याचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply