पनवेल : वार्ताहर
सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथे एका खासगी बसला बुधवारी (दि. 18) पहाटे झालेल्या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूरवरून बदलापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस (एमएच 08 ई 9287) बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कामोठे येथील पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात बसमधील 16 प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये चार चिमुकल्यांचा आणि दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे.
कोल्हापूर येथून ही गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आल्यावर चालकाची बदली झाली. त्यानंतर ही गाडी एक्स्प्रेस वेवरून खाली उतरल्यावर सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथे अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी
भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …
RamPrahar – The Panvel Daily Paper