Breaking News

अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर – आशा की किरन फाऊंडेशन आणि अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पनवेलमधील फडके नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व ईद मीलनही झाले.

कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक बशीर कुरेशी, एन. डी. खान, नूरजहा कुरेशी आणि सलमा खान यांनी केले होते. या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, बशीर अ‍ॅण्ड असोसिएटचे चेअरमन डॉ. बशीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी अतुल महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि पालकांना करियर गाईडन्सबाबतचे मार्गदर्शन केले. डॉ. माधवी क्षीरसागर व तेजस्विता डेरे यांनी व्यसनाचा दुष्परिणाम व व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून हाजी अफसर कुरेशी, आयेशा कुरेशी व सय्यद शब्बीर यांना लोकगौरव आणि अमरदीप गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर दलितमित्र सुदेश दळवी यांच्या जिगर या आत्मचरित्रास जीवनवेल सन्मान देण्यात आला. दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत विशेष यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेशसिंग राजपूत व तस्सलिमून खान यांनी केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply