Breaking News

‘कांगारूं’ची ‘किवीं’वर मात ; न्यूझीलंडवरील विजयाने ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी कायम

लॉर्ड्स : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 86 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ‘कांगारूं’च्या 244 धावांचा पाठलाग करताना ‘किवी’चा संघ केवळ 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. हेन्री निकोलास आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये 55 धावांची अर्धशतकी भागीदारीही झाली, मात्र स्टार्कने विल्यमसनला माघारी धाडत न्यूझीलंडची जोडी फोडली. त्याने 40 धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या डावाला गळतीच लागली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. मिचेल स्टार्कने भेदक मारा करीत न्यूझीलंडची अखेरची फळी

कापून काढली.

तत्पूर्वी, लॉकी फर्ग्युसन, जिमी निशम आणि ट्रेंट बोल्ट यांनी भेदक मारा करीत अवघ्या 92 धावांत ‘कांगारूं’चा निम्मा संघ माघारी धाडला, पण उस्मान ख्वाजाने अ‍ॅलेक्स कॅरीच्या मदतीने भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. 

बोल्टने या सामन्यात अखेरच्या षटकात हॅट्ट्रिकची नोंद केली. न्यूझीलंडकडून बोल्टने चार, जिमी निशम आणि लॉकी फर्ग्यसुनने प्रत्येकी दोनम तर कर्णधार केन विल्यमसनने एक गडी बाद केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply