Breaking News

पनवेल ः महानगरपालिकेंतर्गत रायगड जिल्हास्तरीय 19 वर्षांखालील मुलांची व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये झाली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्‍या मंदार मुंबईकर यांचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी विशेष कौतुक केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राज आलोनी उपस्थित होत्या.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply