Breaking News

‘राहुल गांधी देश कुठे घेऊन जाताहेत?’

झारखंड ः वृत्तसंस्था

एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे राहुल गांधी देश कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत? आम्ही जेव्हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला तेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा राहुल गांधींनी त्याचा निषेध केला.  राहुल गांधी यांनी आता किमान आपल्या देशातील जनतेला हे तरी सांगावं की ते देशाला कोणत्या दिशेने नेत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडमध्ये राहुल गांधींवर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. त्यादरम्यान झारखंड येथे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40पेक्षा जास्त जवान शहीद झाले. त्यानंतर 13 दिवसांनी बालाकोट या ठिकाणी एअर स्ट्राइक करत केंद्र सरकारने पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ही गुप्त कारवाई होती. जी उघड झाल्यानंतर काँग्रेसने एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले होते, तसेच किती दहशतवादी मारले गेले, असा प्रश्नही विचारला होता. यावरून काँग्रेसविरोधात संतापाची लाट उसळली होती, तर उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करून भारताने पाकिस्तानला उत्तर दिले होते, मात्र सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे काय, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विचारला होता. याच दोन मुद्यांचा आधार घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने शौर्य दाखवत पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले, मात्र याबाबत राहुल गांधी यांनी संशय घेतला आहे. उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचे त्यांनी पुरावे मागितले होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply