उरण : प्रतिनिधी
उरण पूर्व विभागात कार्यरत असलेल्या आम्ही पिरकोनकर समूहातर्फे सालाबादप्रमाणे नुकतीच पावसाळी क्रिकेट स्पर्धा पिरकोन प्रीमियर लीग घेण्यात आली. गुणवंत स्पोर्ट्स हा संघ पीपीएलचा विजेता ठरला.
पिरकोन गावातील आठ संघांकडून उरण पूर्व भागातील प्रत्येकी दोन आयकॉन खेळाडू खेळताना दिसले. या स्पर्धेत विजय स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर म्हणून आदेश मोकल या खेळाडूला गौरविण्यात आले, तर उत्कृष्ट गोलंदाजाचा मान रोहन पाटील यांना मिळाला.
स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणून आयोजिलेल्या समालोचक वि. पंच या फ्रेंडली सामन्यात समालोचकांच्या संघाने बाजी मारली. कळंबुसरे गावातील कराटेपटू प्रांजल सचिन पाटील या विद्यार्थिनीचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या वेळी सन्मान करण्यात आला.