Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू

श्रीनगर : वृत्तसंस्था  – जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती, मात्र सकाळी 7.30च्या दरम्यान दरीत कोसळली. बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले असल्याचं समोर आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील बस दुर्घटनेबद्दल मी फार दुःखी आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो, तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो, असं अमित शाह यांनी ट्विट केलं आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply