Saturday , March 25 2023
Breaking News

पेण न्यायालयात मध्यस्थ कक्षाचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी  – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये मध्यस्थ मंडळ कक्षाचे उद्घाटन नुकतेच न्या. विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या मध्यस्थी कक्षाच्या वतीने न्यायालयात येणारी कौंटुंबिक प्रकरणे दाखल होण्यापूर्वीच तडजोडीने मिटविण्याची प्रक्रिया पार पडणार असून, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.

या कार्यक्रमास न्या. निनाद काकडे, मानसी खासनीस यांच्यासह पेण वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नंदू म्हात्रे, अ‍ॅड. फडके, अ‍ॅड. भगवान म्हात्रे, अ‍ॅड. देशमुख, अ‍ॅड. आर. आर. म्हात्रे, अ‍ॅड. सुयोग कडू, अ‍ॅड. माधुरी म्हात्रे, अ‍ॅड. महेश देसले, अ‍ॅड. कामत, अ‍ॅड. वर्षा म्हात्रे, अ‍ॅड. भक्ती पाटील, अ‍ॅड.नितीन पाटील, अ‍ॅड. सूरज पाटील, अ‍ॅड. प्रतिभा म्हात्रे, अ‍ॅड. संकेत कटके, अ‍ॅड. मनीष म्हात्रे, अ‍ॅड. महेंद्र म्हात्रे, अ‍ॅड. विशाल पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मध्यस्थ मंडळाच्या वतीने दोन प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply