Saturday , March 25 2023
Breaking News

विजेचे जीर्ण खांब बदलावेत

कर्जत डेक्कन जिमखान्यातील नागरिकांची मागणी

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – पावसाळ्यात सडलेले लोखंडी विजेचे खांब पडून जीवित हानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करुन कर्जत डेक्कन जीमखाना परिसरातील नागरिकांनी, जीर्ण झालेले पोल बदलावेत, अशी मागणी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

नगरसेविका मधुरा चंदन -पाटील यांनी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन दिले. त्यात, कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ तसेच कचेरी रोड, डेक्कन जिमखाना परिसरातील सडलेले विजेचे लोखंडी खांब बदलण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सुचिता वांजळे, महेंद्र चंदन-पाटील, राजू पोतदार, प्रमोद दानवे, सुनिल आंबवणे, मिलिंद सप्रे, महेश पुरवंत, कौशिक वांजळे, नरेश बैलमारे, अशोक पिंपरकर, अशोक गायकवाड यांच्यासह डेक्कन जिमखाना मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.उप कार्यकारी अभियंता घुले यांनी, हे काम या आठवड्यात करण्यात येईल तसेच गार्डींग बसविण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच कर्जत तालुक्यात सुमारे 600 खांब बदलण्यात येणार असल्याचे सांगितले.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply