खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मार्फत 23 ते 25 फेब्रुवारी 2023 यादरम्यान ’टेक्नो ब्रिन्क’च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या टेक्नो ब्रिन्कचा प्रमुख उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आजच्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व माहिती व्हावी हा आहे. या टेक्नो ब्रिन्कच्या माध्यमातून येणार्या तीन दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत: टेक-रंगोली, रिल्स, बी. जी. एम. आय, एन. एफ. एस, वादविवाद, कोडवार व प्रश्नमंजुषा, ऑनलाइन क्यूज, पी.पी.टी, ट्रेझर हंट व वेब डिझायनिंग या सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. रश्मी पाटील, प्रा. महेश्वरी झिरपे (समन्वयक अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष) तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी ह्या सर्व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत तसेच या सर्वांनी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यी व विद्यार्थिनींना या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी विनंती केली आहे.