Breaking News

कर्जत वंजारवाडीमध्ये वृक्ष लागवड

कडाव : प्रतिनिधी

33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वंजारवाडी परिसरातील संरक्षित वन क्षेत्रात पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनल वळवी, पंचायत समिती सदस्या सुरेखा हरपुडे, अरुण हरपुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली.

1 जुलै ते 30 ऑगष्टपर्यंत सुरु राहणार्‍या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वंजारवाडीमधील वनविभागाच्या संरक्षित वनामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व्हे नंबर 35 च्या 25 हेक्टर क्षेत्रावर वनविभागाकडून खैर, शिवन, शिसव, काजू, आवल, कांचन, वेहला,बांबू, बावा या वृक्षांची लागवड  करण्यात आली. त्यावेळी  वनपाल हिम्मत पाटील, वनरक्षक बाळाजी घुले, आर. एस. निकम, पी. भी. कोळी, एच. जी. चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply