Breaking News

मॉडर्न स्कूलची आर्या सुर्वे थाय बॉक्सिंगमध्ये चॅम्पियन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्र्धेेमध्ये वाशी येथील मॉडर्न स्कूलची विद्यार्थिनी आर्या सुर्वे हिने सुवर्णपदक जिंकून यंदाची राष्ट्रीय थायबॉक्सिंग चॅम्पियनशिप मिळविली. या यशाबद्दल सर्व स्तरातून आर्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत देशातील सुमारे 26 राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये वाशी मॉडर्न स्कूलची दहावीत एम 2मध्ये शिकणार्‍या आर्या सुर्वे हिने 14 वर्षाखालील व 55 किलो वजनी गटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले व सुयश प्राप्त केले. याव्यतिरिक्त आर्याने नवी मुंबई जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेतसुद्धा यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन त्यांचा विकास करणे हेच रयत  शिक्षण संस्थेचे व मॉडर्न स्कूलचे ध्येय असल्याचे विद्यालयाच्या प्राचार्य  सुमित्रा भोसले यांनी आर्याचे अभिनंदन करताना सांगितले तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

न्हावे येथील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पार्थ इंटरप्रायझेसच्या वतीने सरपंच चषक 2024 क्रिकेट स्पर्धा न्हावे येथे आयोजित …

Leave a Reply