Breaking News

‘स्वच्छतेच्या कामात सातत्य राखा’

पेण : प्रतिनिधी

सफाईच्या बाबतीत कर्मचार्‍यांनी सातत्य राखावे, असे आवाहन पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सफाई कर्मचार्‍यांना केले.

स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 च्या अनुषंगाने पेण नगर पालिका सभागृहात सफाई कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून, त्यामध्ये पेण नगर पालिकेचा क्रमांक लागण्यासाठी सफाई कर्मचार्‍यांचा सहभाग हा मोलाचा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सफाई कर्मचार्‍यांनी आपली कामे चोख बजावत असताना  घनकचर्‍याचे व्यवस्थापन व्यवस्थित केले तर अनेक ठिकाणी होणारी कचर्‍याची समस्या नष्ट करण्यात आपण यशस्वी ठरू शकतो.  कर्मचार्‍यांनी त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी सर्व कचरा गोळा करावा, गटारातील कचरा कचरा कुंडीत जमा करावा, ओला कचरा-सुका कचर्‍याचे वर्गीकरण करीत असतानाच हा कचरा इतरत्र पसरणार नाही याची काळजी कर्मचार्‍यांनी घ्यावी, अशा सूचना अर्चना दिवे यांनी यावेळी केल्या. 

 शहर स्वच्छ ठेवत असतानाच कामगारांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून, यासाठी शासनातर्फे देण्यात हातमोजे, गमबुट, मास्क तसेच गणवेश यांचा पुरेपूर वापर करणे अनिवार्य असल्याचे मुख्याधिकारी दिवे यांनी सांगितले. पेण नगर पालिकेच्या अंकिता इसळ, आरोग्य निरीक्षक दयानंद गावंड, आरोग्य विभाग शहर समन्वयक विशाल सकपाळ आदी अधिकार्‍यांसह नगर पालिका सफाई कर्मचारी या शिबिरास उपस्थित होते.

Check Also

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. …

Leave a Reply