नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती कंपनी फायझर यांच्यादरम्यान एक उच्चस्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, या वर्षीच्या तिसर्या तिमाहीपर्यंत देशाला पाच कोटी लसीचे डोस मिळणार आहेत. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन अशा दोन लसी उपलब्ध आहेत, तसेच रशियाची स्पुटनिक व्ही लसही आता दाखल झाली आहे. या व्यतिरिक्त आणखी एक औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे कोरोना रुग्णांना बराच दिलासा मिळू शकेल. डीआरडीओने विकसित केलेले अॅण्टी-कोविड औषध 2-डीऑक्सी डी ग्लुकोज (2-डीजी)चे 10 हजार डोस पुढील आठवड्यात बाजारात येणार आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper