Thursday , March 23 2023
Breaking News

झाड उन्मळून पडल्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मदतीला धावल्या

पनवेल ः वार्ताहर

गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. यातच आज नवीन पनवेल सेक्टर 8, रोड नं. 7 येथील एक झाड उन्मळून पडल्याचे समजताच शिवसेना नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांनी त्वरित त्या ठिकाणी धाव घेऊन संबंधित सिडको अधिकार्‍यांशी संपर्क साधून पदपथ मोकळा करून दिला. नवीन पनवेल येथील फुटपाथवरील झाड उन्मळून रस्त्यावर पडले होते. याची माहिती शिवसेना नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू व स्थानिक नगरसेवक समीर ठाकूर यांना मिळताच त्यांनी संबंधित सिडको अधिकार्‍यांना फोन करून या घटनेबाबत माहिती दिली व ताबडतोबीने रस्त्यावरील झाड हटवून गाड्यांना येण्या-जाण्याचा रस्ता पूर्ववत करून दिला. यावेळी त्यांच्याबरोबर प्रभाग 16 च्या विभाग प्रमुख वैशाली थळी, काळे आणि सेक्टर 8 चे रहिवासी उपस्थित होते. या तत्पर कामाबद्दल स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply