Breaking News

जेएनपीटीकडून जसखारची पाहणी

उरण ः प्रतिनिधी

सहा दिवस सतत मुसळधार पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपले असून, उरण तालुक्यात जसखार गावातील घरांना सर्वात जास्त पुराचा झटका बसला. जसखार गाव जलमय झाले होते. या पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे, जेएनपीटीचे माजी विश्वस्त दिनेश पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, राजेश म्हात्रे विश्वनाथ घरत, कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य परेश ठाकूर, सचिन ठाकूर, अनंत मढवी, प्रमोद मढवी आदींनी केली. तसेच संपूर्ण गावातील पुराचे पाणी कशामुळे अडकून राहते याचे नियोजनही जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक सुनील मानभावे यांच्या आधिपत्याखाली प्रत्येक ठिकाणी जाऊन करण्यात आले, मात्र याची अंमलबजावणी कधी केली जाणार या प्रतीक्षेत पुराचा फटका बसलेले सामान्य नागरिक असून, अधिकारी आणि पुढारी यांच्या चर्चेतून जसखारवासीयांची किमान पुढील पावसाळ्यातील तीन महिन्यांसाठी काय व्यवस्था जेएनपीटीकडून करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply