पुणे ः केंद्रीय अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. सहकाराची सुरुवात झालेल्या प्रवरा येथे शनिवारी (दि. 18) देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसेच विचारमंथनही होणार आहे. या परिषदेस गृहमंत्री शाह उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या वेळी शाह काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. शाह शिर्डीलाही भेट देणार असून साईबाबांचे दर्शन घेणार आहेत, तर दुसर्या दिवशी रविवारी (दि. 19) पुण्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण शाह यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित असतील.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …