Breaking News

माणगावामधून अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा सापडला महाडमध्ये

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील नाईटने गावातील अल्पवयीन मुलाचे बुधवारी दुपारी अपहरण अज्ञात व्यक्तीने केले होते. मात्र तो महाड एमआयडीसी पोलिसांना आढळला. माणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या आई्च्या हवाली केले.

माणगाव तालुक्यातील नाईटने गावातील अंश अरविंद जाधव (वय 14) हा बुधवार (दि. 2) दुपारपासून  हरवला होता. शोध घेऊनही तो सापडला नाही. म्हणून त्याची आई सुषमा अरविंद जाधव (वय 33) यांनी रात्री पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  सहाय्यक फौजदार श्री. वाटवे तपास करीत होते.

दरम्यान, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालीत असताना त्यांना एक मुलगा दिसून आला. चौकशी केली असता त्या मुलाने सांगितले की, आपल्याला अज्ञात महिलेने फूस लावून पळवून आणले असून, अर्ध्या तासात येते असे सांगून ती महिला निघून गेली आहे. त्यानंतर महाड  एमआयडीसी पोलसांनी माणगाव पोलीस ठाण्यात चौकशी केली असता, सदर मुलाचे अपहरण अज्ञात व्यक्तीने केले असल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.

माणगाव पोलिसांनी मुलाची आई सुषमा जाधव यांच्यासह महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन अंशला ताब्यात घेतले आणि त्याला सुखरूप आईच्या ताब्यात दिले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply