पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिघाटी, करंजाडे, कळंबोली, तळोजा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गरिबांना यंदाच्या गणेशोत्सवामध्ये फराळ, प्रसाद करता यावा या हेतूने मैदा, साखर, चनाडाळ, रवा, डाळडा, गुळ अशा पदार्थांचे वाटप केले.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper