Breaking News

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. जयश्री पाटील

पनवेल : वार्ताहर – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण समारंभ नुकताच श्रीकृपा हॉल, खांदा कॉलनी येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या डीजीएन रोटेरियन रश्मी कुलकर्णी या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

रोटरी कर्णबधीर शाळेतील मुलींनी अतिशय सुंदर गणेश वंदना सादर केली. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे यांनी प्रमुख पाहुण्यांचे व व्यासपीठावरील इतर मान्यवरांचे स्वागत केले.  गत वर्षात केलेल्या उपक्रमांचा आढावा त्यांनी चित्रफितीद्वारे सुंदररीत्या सादर केला. त्यांनी अतिशय उपयुक्त असे समाजोपयोगी 107 उपक्रम पूर्ण केले. डिस्ट्रिक्टकडून त्यांच्या या कामाबद्दल त्यांना बेस्ट प्रेसिडेंटचे दुसर्‍या क्रमांकाचे अ‍ॅवॉर्ड मिळाले. शिवाय अ‍ॅप्रेसिएशन अ‍ॅवॉर्डही मिळाले. दुसरे बेस्ट सेक्रेटरीचे अ‍ॅवॉर्ड सोनाली परमार, बेस्ट एडिटर ध्वनी तन्ना यांनी पटकावले.

मावळत्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, ‘गेल्या वर्षभरात केलेल्या कामांमुळे खूप समाधान मिळाले. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार करताना स्वतःचा खूप अभिमान वाटला. ‘उपक्रम करताना मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचेच मनापासून आभार मानले. सेक्रेटरी सोनारी परमार, ट्रेझरर हेतल बालड, आयएससो अमृता गायकवाड यांनी आपले रिपोर्ट सादर केले.

मावळत्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे यांनी नूतन अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील यांची ओळख करून दिली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने डॉ. जयश्री पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि आपली टीम जाहीर केली. नूतन अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील यांनी मावळत्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे आणि सेक्रेटरी सोनाली परमार यांना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सात नवीन मेंबर्सचे पीन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एडिटर शुभदा भगत संपादित प्रतिबिंब या क्लब बुलेटीनचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.

नूतन अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील यांनी प्रमुख पाहुण्या डीजीएन रश्मी कुलकर्णी यांची ओळख करून दिली. रश्मी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात मावळत्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे यांनी केलेल्या कामाचे खूप कौतुक केले. या वर्षीच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील याही असेच उपयुक्त आणि चांगले उपक्रम राबवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करून  नूतन अध्यक्षा आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

ध्वनी तन्ना यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन शिल्पा नागावकर आणि ध्वनी तन्ना यांनी नेमक्या आणि सुंदर शब्दात सादर केले. यावेळी रोटेरियन्स डॉ. जयश्री पाटील यांचे आप्तेष्ट, मित्रमंडळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply